Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईशिवसेना नगरसेवकाच्या घरावर दरोडा!

शिवसेना नगरसेवकाच्या घरावर दरोडा!

Navi Mumbai, Robberyनवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका विरोधी पक्ष नेते आणि शिवसेनेचे नगरसेवक विजय चौगुले यांच्या घरी नोकरानेच दरोडा टाकला. काल संध्याकाळी घरात कुणीच नसल्याचा फायदा घेत आरोपीने हातसफाई केली. ३० लाख रुपयाचा मुद्देमाल होता. या घटनेमुळे  परिसरात एकच खळबळ उडाली.

१९ वर्षीय आरोपी अनुराग सिंग हा गेल्या पाच वर्षांपासून विजय चौगुले यांच्याकडे कामाला होता. काल संध्याकाळी ७ ते रात्री १२ पर्यंत घरात कोणीच नसल्याचा फायदा घेत आरोपी अनुरागने दरोडा टाकून ९० तोळे सोने आणि अडीच लाख रोख रक्कम घेवून पोबारा केला. एकूण ३० लाख किंमतीचा ऐवज आरोपीने लंपास केला आहे.
खिडकीची ग्रील वाकवून बेडरूम मध्ये आरोपीने प्रथम प्रवेश केला. यानंतर घरातील किंमती दागिने आणि पैसे लुटले. चोरी करून इमारतीमधून बाहेर पडताना आरोपी प्लास्टीक पिशवी हातात घेऊन जात असल्याचे आढळले आहे. दरम्यान या प्रकरणी रबाले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पथक दरोडोखोराला अटक करण्यासाठी रवाना झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments