Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईश्रावणात जोगेश्‍वरीत उत्सव नात्यांचा विविध आकर्षक वस्तुंचे भव्य प्रदर्शन

श्रावणात जोगेश्‍वरीत उत्सव नात्यांचा विविध आकर्षक वस्तुंचे भव्य प्रदर्शन

- ३ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते रात्री रात्री ८ पर्यंत प्रदर्शनाचे आयोजन - रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंती, गणेशोत्सवासाठी आवश्यक सजावटींच्या वस्तुंचाही समावेश - ‘मैत्री’ गृप तर्ङ्गे जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोड येथील सुप्रिमो ऍक्टीव्हीटी सेंटरमध्ये भरणार प्रदर्शन

मुंबई : ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणार्‍या विविध सणासुदिच्या दिवसाचे औचित्य साधत जोगेश्‍वरीतील ‘मैत्री’ गृप तर्ङ्गे सणासुदिची रंगत अधिक वाढविण्यासाठी विविध सजावट तसेच गृहपयोगी वस्तुंच्या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे एकाच छत्राखाली सणासुदिसाठी आवश्यक वस्तु खरेदी करण्याची सुवर्ण संधी यानिमित्ताने ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.
पावसाळा संपत आला की जनतेला वेध लागतात ते सणासुदिचे. त्यातच ऑगस्ट महिन्यापासून विविध सणांना सुरूवात होत आहे. नारळी पोर्णिमा, रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन, श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला त्यानंतर गणेशोत्सव अशा विविध सण मसेच महोत्सवांचा समावेश आहे. हे सण अधिक आकर्षक पद्धतीने साजरे करता यावे, ते ते आकर्षक दिसावे यासाठी आवश्यक सजावटीच्या वस्तुंचे विविध स्टॉल्स या प्रदर्शनास बघावयास मिळणार आहे. त्यातच या सणांचा गोडवा अधिक वाढावा यासाठी गोड तसेच अन्य खाद्य पदार्थ, आकर्षक रंगसंगती असलेले रेडीमेड तसेच ड्रेस मेटेरीयल, इमिटेशन ज्वेलरी आदी स्टॉल्सचा यात समावेश आहे.
जोगेश्‍वरीतील ‘मैत्री’ गृप तर्ङ्गे दरवर्षी अशाप्रकारच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही ३ ऑगस्ट रोजी जोगेश्‍वरी-विक्रोळी लिंक रोड येथील सुप्रिमो ऍक्टीव्हीटी सेंटर येथे हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी मोङ्गत खुले राहणार आहेत. या प्रदर्शनास भेट देणार्‍यांसाठी बंम्पर हौजीचा खेळ खेळण्यात येणार आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मैत्री गृपच्या मनिषा वायकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments