Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रविकृतीचा कळस : रेस्टॉरंटच्या कर्मचा-याचा महिलेसमोर हस्तमैथुन

विकृतीचा कळस : रेस्टॉरंटच्या कर्मचा-याचा महिलेसमोर हस्तमैथुन

RPF Constable rape taxi driverमुंबई : लोकलमध्ये तसेच खासजी वाहनांमध्ये महिला, तरुणींसमोर हस्तमैथुन करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. मरीन लाइन्स येथे महिलेसमोर रेस्टॉरंटच्या कर्मचा-याने हस्तमैथुन केले. हा धक्कादाय प्रकार समोर आल्यानंतर त्या विकृत कर्मचा-याला पोलिसांनी अटक केली.

दक्षिण मुंबईतील एका चायनीज हॉटेलमध्ये आरोपी नोकरीला आहे. महिलेसमोर हस्तमैथुन केल्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे.

बुधवारी सकाळी महिला पारसी डेअरी फार्मच्या विरुद्ध दिशेला बसलेली असताना आरोपी तिच्या जवळ जाऊन बसला. महिला तिच्या फोनवरुन बोलत असताना, आरोपी तिच्याजवळ गेला. महिलेसमोरच आरोपीने आपल्या पँटची चैन उघडली व आक्षेपार्ह कृती सुरु केली. त्याचे वर्तन पाहून महिलेने आरडाओरडा सुरु केल्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला. महिलेने नंतर एलटी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

सीसीटीव्ही कॅमे-यामुळे आरोपीचा लागला छळा…

मरीन लाईन्सला ही घटना घडली, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. त्यावरुन आरोपीची ओळख पटवण्यात आली. आरोपीला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर महिलेने त्याला ओळखले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली अशी माहिती एलटी मार्ग पोलिसांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments