Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईअभिनेता एजाज खान भायखळ्यातून एमआयएमच्या वारिस पठाणच्या विरोधात मैदानात

अभिनेता एजाज खान भायखळ्यातून एमआयएमच्या वारिस पठाणच्या विरोधात मैदानात

Ajaz Khanमुंबई : बॉलिवूड अभिनेता एजाज खानला एमआयएमने मुंब्रा कळवा मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने त्याने थेट एमआयएमचे विद्यमान आमदार वारिस पठाण यांच्याविरोधात दंड थोपटले आहे. मुंबईतील भायखळा मतदारसंघातून एजाजने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे एमआयएमची डोकेदुखी वाढली असून, येथील लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे.

एजाज ने एमआयएमच्या उमेदवारीसाठी एमआयएमच्या नेत्यांचे उंबरठे झिझवले.

एमआयएमकडून निवडणूक लढवून मी जिंकतो मला तिकीट द्या अशी मागणी केली. परंतु एजाजच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या एजाजने अपक्ष उमेदवारी दाखल केली. ‘बिग बॉस’ फेम अभिनेता एजाज याने आपण अपक्ष म्हणून भायखळ्यातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती एजाजने ट्विटरवरुन दिली आहे.

एजाज खान बाबत थोडक्यात

बिग बॉसमध्ये झळकलेला एजाज खान अनेक वेळा वादांच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याने तुरुंगवारीचाही अनुभव गाठीशी घेतलेला आहे. शारीरिक आणि लैंगिक अत्याचाराचे आरोप एजाजवर आहेत. टिकटॉक व्हिडीओच्या माध्यमातून धार्मिक तेढ पसरवल्याच्या आरोपातून त्याने तुरुंगवारी भोगली आहे. सध्या तो जामिनावर बाहेर आहे.

एजाजने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत ‘एमआयएम’ची डोकेदुखी वाढवल्याचं म्हटलं जात आहे. भायखळा हा मुस्लिमबहुल भाग आहे. या मतदारसंघावर ‘एमआयएम’चा कब्जा आहे. मात्र एजाजही रिंगणात उतरल्यामुळे मुस्लिम मतं विभागली जाण्याची भीती वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे अखिल भारतीय सेनेकडून गीता गवळी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments