Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रकोरोनाच्या धास्तीने अभिनेते दिलीप कुमार आयसोलेशनवर!

कोरोनाच्या धास्तीने अभिनेते दिलीप कुमार आयसोलेशनवर!

Actor Dilip Kumar under isolation, corona test, coronavirus, coronaमुंबई : कोरोनाने जगभरात हैदोस घातला आहे. कोरोनाच्या धास्तीने सुपरस्टार दिलीप कुमार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर ९७ वर्षीय दिलीप कुमार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करत स्वतःला कोरोनापासून वाचवण्यासाठी आयसोलेशनवर ठेवल्याची माहिती दिली आहे.

अभिनेते दिलीप कुमार यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्वीट करत सांगितले की, ‘सायरा त्यांना कोरोनापासून वाचवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांना पूर्णपणे आयसोलेशनवर ठेवण्यात आलं आहे. याचबरोबर त्यांनी आपल्या फॅन्सलाही काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.


गरज नसताना घराबाहेर पडणं टाळा आणि आपल्यासोबतच इतरांचीही काळजी घ्या, तसेच आरोग्य विभागाने जारी केलेल्या सर्व सुचनांचं पालन करण्याचंही आवाहन दिलीप कुमार यांनी केलं आहे.
हे अभिनेते, अभिनेत्र्या कोरोनाच्या विळख्यात…

हॉलिवूड अभिनेता टॉम हँक्स आणि त्यांची पत्नी रीटा विल्सनला देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

जेम्स बॉन्ड सीरिजमधील चित्रपट ‘क्वांटम ऑफ सोलेस’मध्ये युक्रेनीची भूमिका साकारलेली अभिनेत्री ओल्गा कुरलेंको हिलादेखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

अॅव्हेंजर्स सीरिजमधील अभिनेता इदरीस एल्बा आणि गेम ऑफ थ्रोन्समधील अभिनेता ख्रिस्टोफर हिवजू यालादेखील कोरोनाची लागण झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments