Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई‘आरे’ मधील कारशेडला आमचा विरोध : आदित्य ठाकरे

‘आरे’ मधील कारशेडला आमचा विरोध : आदित्य ठाकरे

शिवसेनेचा मेट्रोला विरोध नसून आरे मध्ये उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित कारशेडला विरोध आहे

मुंबई: शिवसेनेचा मेट्रोला विरोध नसून आरे मध्ये उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित कारशेडला विरोध आहे असे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मेट्रो कारशेडसाठी करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीला आमचा विरोध कायम असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितले आहे.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांच्यासोबत काही तज्ञ उपस्थित होते. यावेळी त्यांनी सादरीकरण करत आरेचे महत्त्व पटवून दिले. तिथे सापडलेल्या वन्यजीवांचे फोटो, व्हिडीओ दाखवत आदित्य ठाकरे यांनी मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाचा दावा फेटाळून लावला.

मेट्रोला विरोध नाही मात्र आरे कारशेडला विरोध आहे असं सांगताना आदित्य ठाकरे यांनी मुंबईत सुरु असलेल्या कोणत्याही पायाभूत सुविधांच्या कामांना आम्ही विरोध केला नसल्याचं सांगितलं. आम्ही फक्त विरोधाला विरोध करत नाही नाही असं सांगताना तांत्रिक मुद्द्यांवर फक्त चर्चा होत असून वस्तुस्थितीबद्दल कोणीही बोलत नाही अशी खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी बॅकबे, ओशिवरा डेपोचा पर्याय असल्याचंही सांगितलं. “ इतकी मनमानी आजपर्यंत कोणीही केलेली नाही. मुंबईकर, न्यायालयाला धमकी दिली जात आहे. आरेला हात लावला तर सहन करणार नाही,” असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला. मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाकडून घोटाळा केला जात आहे का? अशी शंकाही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments