Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमनोरंजनअखेर महाराष्ट्रात 'तान्हाजी' करमुक्त

अखेर महाराष्ट्रात ‘तान्हाजी’ करमुक्त

Uddhav Thackeray Tanhaji,Uddhav, Thackeray, Tanhaji,Uddhav Thackeray

मुंबई: ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ चित्रपट उत्तर प्रदेश आणि हरयाणा नंतर महाराष्ट्रात करमुक्त झाला आहे. महाराष्ट्रात करमुक्त करण्यासाठी १५ जानेवारीच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमत झाले होते. आज बुधवार (२२ जानेवारी) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाला मंजुरी देण्यात आली.

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी करमणूक कर आता जीएसटीच्या अखत्यारीत येत असल्याने राज्य सरकार एसजीएसटीचा परतावा देणार आहे, असे थोरात यांनी १५ जानेवारीला सांगितले होते. उत्तर प्रदेश आणि हरयाणा या राज्यांनी ‘तान्हाजी’ चित्रपट आधीच करमुक्त केला आहे. आता महाराष्ट्रात करमुक्त झाला आहे.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यासंदर्भात मला पत्र लिहून महाराष्ट्रातील चित्रपट रसिक आणि शिवप्रेमींची ‘तान्हाजी’ चित्रपट करमुक्त करावा, ही भूमिका आग्रहाने मांडली होती. या मागणीचा विचार करून ‘तान्हाजी’ चित्रपट करमुक्त करण्याचा विचार मंत्रिमंडळाने केला व त्यावर सर्वांचेच एकमत झाले, अशी माहिती थोरात यांनी ट्विटरच्या माध्यमातून १५ जानेवारीला दिली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments