Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईअजित पवारांचा पदभार स्विकारण्यास तूर्तास नकार; भाजपच्या गोटात चिंता

अजित पवारांचा पदभार स्विकारण्यास तूर्तास नकार; भाजपच्या गोटात चिंता

Debt increases on over Maharashtra in five years; angry opponentमुंबई: देवेंद्र फडणवीस यांनी आज सोमवारी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारला. मात्र, राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार सध्या तरी स्वीकारला नाही. त्यामुळे भाजपच्या गोटात चिंता पसरली आहे.

अजित पवार आज मंत्रालयात आले होते. यावेळी त्यांनी दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत जवळपास चार तास चर्चा केली. त्यांनतर अजित पवार पदभार न स्वीकारताच चर्चगेटमधील घरी परतले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी मनधरणीचे केलेले प्रयत्न यशस्वी ठरण्याची चिन्हं दिसत आहेत.

अजित पवारांच्या मनात काही वेगळं सुरु आहे. ते पुन्हा राजीनामा देतील का अशी चर्चा सुरु झाली आहे. उद्या मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने फडणवीस सरकारला फ्लोअरटेस्ट घेण्याचे सांगितले तर त्यामध्ये फडणवीस सरकार कोसळण्याची खात्री आहे. त्यामुळे अजित पवारांनी सध्या पदभार स्वीकारला नाही अशीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments