Placeholder canvas
Tuesday, April 16, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईअजित पवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फोनकरून दिल्या शुभेच्छा

अजित पवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फोनकरून दिल्या शुभेच्छा

मुंबई: मनसे विधानसभेच्या आखाड्यात उतरली आहे. त्यामुळे विधानसभेचा रणसंग्राम जोरात होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही जोरदार ताकद लावली आहे. अजित पवार म्हणाले की, मनसे विधानसभा निवडणूक लढवत आहेत. मी राज ठाकरे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी देखील मला शुभेच्छा दिल्या.

मागच्या विधानसभा निवडणुकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर विशेष म्हणजे अजित पवारांवर जोरदार टीका केली होती. मात्र, यंदाच्या लोकसभेपासून राज ठाकरे यांनी पवार कुटुंबियांशी जवळीक साधली आहे. त्यामुळे दोघांमधील सुसंवाद वाढला आहे. त्यामुळे दोघांनी अजित पवार आणि राज ठाकरे यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
राज ठाकरे यांनी लोकसभेला भाजपच्या विरोधात रणशिंग फुकले होते. त्यामुळे त्यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्या होत्या मात्र त्यावेळी काँग्रेस आघाडीला म्हणावा तसा फायदा झाला नव्हता.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments