Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्र….अन् दाऊद इब्राहिमच्या हत्येचा कट फसला!

….अन् दाऊद इब्राहिमच्या हत्येचा कट फसला!

dawood-ibrahim-ejaz-lakdawalaमुंबई: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इ्ब्राहिम सध्या पाकिस्तानमधील कराची शहरात वास्तव्यास आहे. दाऊदची मुलगी मारिया हिच्या निधनानंतर तिच्या अंत्यविधीसाठी दाऊद कराचीतील एका दर्ग्यात येणार होता. दर्ग्याबाहेर आम्ही दाऊदला ठार करण्यासाठी सापळा रचला होता, परंतु याची हत्येच्या कटाची माहिती लिक झाल्यामुळे डाव फसला. असा खळबळजनक खुलासा कुख्यात डॉन एजाज लकडावाला याने पोलिसांच्या चौकशीदरम्यान केल्याची माहिती समोर आली आहे.

छोटा राजनचा विश्वासू सहकारी असलेल्या विकी मलहोत्रासोबत सन १९९८ मध्ये  दहा जण काम करीत होते, असे लकडवाला याने मुंबई पोलिसांना सांगितले. काही दिवसांपूर्वीच त्याला मुंबई पोलिसांनी पाटणा येथील विमानतळावरुन ताब्यात घेतले होते. दरम्यान, तो सध्या कोठडीत असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. बरीच माहिती एजाजने पोलिसांनी चौकशीदरम्यान दिली आहे. त्यामुळे बरीच माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने छोटा राजनचा दाऊदला ठार करण्याचा डाव होता. त्यावेळी मी विकी मलहोत्राच्या टीमचा भाग होतो. यामध्ये फरीद तानाशा, बाळू डोकरे, विनोद मतकर, संजय घाटे आणि बाबा रेड्डी यांचाही समावेश होता. दाऊदची मुलगी मारिया हिच्या निधनानंतर तिच्या अंत्यविधीसाठी दाऊद कराचीतील एका दर्ग्यात येणार होता. याचवेळी त्याला ठार करण्यासाठी आम्ही त्या दर्ग्याबाहेर तयार होतो, असे लकडावला याने पोलिसांशी बोलताना सांगितले.

हत्येचा कट या कारणामुळे फसला….

दाऊदच्या जवळचा सहकारी आणि नेपाळचा खासदार असलेल्या मिर्झा दिलशाद बेग याने दाऊदला शेवटच्या क्षणी आमच्या कटाची माहिती दिली, त्यामुळे आमचा दाऊदला ठार करण्याचा प्रयत्न फसला. यामुळे नाना (छोटा राजन) बेगवर खूपच चिडला होता. त्यानंतर त्याचवर्षी त्याने बेगचा खून केला, असंही लकडावला याने पोलिसांना चौकशीदरम्यान दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments