Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईअंधेरीच्या इंजिनिअरची गुजरातमध्ये हत्या

अंधेरीच्या इंजिनिअरची गुजरातमध्ये हत्या

Andheri's engineer killed in Gujaratमुंबई : अंधेरी येथील राहणा-या एअर इंडियाच्या इंजिनीअरची गुजरातमध्ये हत्या करण्यात आली आहे. दीपक पांचाळ (वय-59) असे हत्या झालेल्या इंजिनीअरचे नाव आहे. त्यांचा मृतदेह गोणीत सापडल्याने खळबळ उडाली आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, गुजरातच्या हलवद पोलिसांना ब्राह्मणी धरणात गोणी सापडली. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना या गोणित मृतदेहाच्या शर्टच्या खिशात पोलिसांना एअर इंडियाच्या फ्लाईटचे तिकीट सापडले. PNR नंबरवरून तपास केला असता हा मृतदेह दीपक पांचाळ यांचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. दीपक पांचाळ यांचे अपहरण करून गुजरातमध्ये त्यांची हत्या करण्यात आली.

अंधेरी येथे राहणारे दीपक पांचाळ एअर इंडियामध्ये इंजिनीअर असून ते अविवाहित होते. 29 सप्टेंबरपासून बेपत्ता होते. पांचाळ यांच्या भावाने त्याबाबत अंधेरी पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती. बरेच दिवस शोध घेऊनही पोलिसांना पांचाळ यांचा थांगपत्ता लागत नव्हता. पांचाळ यांचे अपहरण झाल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला. चौकशी सुरू असतानाच गुजरातच्या हलवद पोलिसांना धरणात मृतदेह असलेली गोणी सापडल्याने खळबळ उडाली.

मृतदेह पांचाळ यांचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त संतोष रस्तोगी यांनी ही माहिती माध्यमांना दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments