Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईयोगी आदित्यनाथांच्या बॉलीवूड भूमिकेवरून काँग्रेस मंत्र्यांने लगावला टोला

योगी आदित्यनाथांच्या बॉलीवूड भूमिकेवरून काँग्रेस मंत्र्यांने लगावला टोला

मुंबई : योगी आदित्यनाथांनी उत्तर प्रदेशातील स्थानिक भोजपुरी चित्रपटांना बळ द्यावं. उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्था सुधारण्याचे काम करावे, असा सल्ला महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिला आहे.

उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्था चांगली नाही. दिवसाढवळ्या लूटमार, महिलांवर अत्याचार केले जातात. महिला अत्याचारांची तक्रार नोंदवून घेतली जात नाही. योगी आदित्यनाथांनी कायदा सुव्यवस्था सुधारण्यासाठी काम करावे, असा टोला अस्लम शेख यांनी लगावला आहे.

योगी आदित्यनाथांनी बॉलिवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशला घेऊन जाण्याची स्वप्न पाहण्यापेक्षा अगोदर उत्तर प्रदेशमधील भोजपुरी आणि स्थानिक चित्रपटांना सोयी सुविधा द्याव्यात. त्यानंतर मुंबईतील बॉलिवूड हलवण्याबाबत विचार करावा.

नरेंद्र मोदी सरकारकडून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. यापूर्वीही असे अनेक प्रयत्न करण्यात आलेले आहेत. पण त्यांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले. काही महिन्यांपूर्वी मुंबई आणि बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांनी केला होता, अशी टीका अस्लम शेख यांनी केली.

मुंबई सर्व जाती धर्माच्या आणि प्रांतांच्या लोकांना सामावून घेणारं शहर आहे. म्हणूनच उद्योग व्यवसाय येथे बहरले. मुंबई सारखं भयमुक्त वातावरण उत्तर प्रदेशमध्ये नाही. अगोदर महाराष्ट्राप्रमाणे भयमुक्त वातावरण उत्तर प्रदेशमध्ये तयार करा नंतर येथील उद्योगधंदे व बॉलिवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशला नेण्याची स्वप्न पाहा, असा टोला शेख यांनी लगावला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये उद्योजकांनी गुंतवणूक करावी आणि तेथे रोजगारनिर्मिती व्हावी, यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जोरदार प्रयत्न करत आहेत. यासाठी ते पुन्हा एकदा मुंबईचा दौरा करणार आहेत.

याआधी आदित्यनाथ यांनी मुंबईत येऊन फिल्म इंडस्ट्रीला उत्तर प्रदेशमध्ये येण्याचं आवताण दिलं होतं. आता ते मुंबईतील उद्योजकांना उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक करण्याचं आवाहन करणार आहेत. योगी आदित्यनाथ 1 आणि 2 डिसेंबरला मुंबईत असणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments