Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईघाटकोपरमध्ये भाजपात राडा ; पराग शाहच्या गाडीची मेहतागटाकडून तोडफोड

घाटकोपरमध्ये भाजपात राडा ; पराग शाहच्या गाडीची मेहतागटाकडून तोडफोड

parag sha car destroyed prakash mehata
Image : TV9 Marathi

मुंबई : भाजपने घाटकोपर पूर्वचे विद्ममान आमदार मंत्री प्रकाश मेहता यांची उमेदवारी रद्द करुन पराग शाह यांना उमेदवारी दिली. यामुळे मेहता गटाच्या कार्यकर्त्यांना पराग शाहांच्या गाडीवर तोडफोड करुन हल्ला करण्यात आला. यामुळे भाजपच्या वाद चव्हाट्यावर आला आहे.

प्रकाश मेहतांचा पत्ता कट करुन पराग शाह यांना उमेदवारी देण्यात आली. ही माहीती समजातच प्रकाश मेहता गटाच्या कार्यकर्त्यांनी पराग शाहच्या गाडीवर दगडफेक केली. व गाडीची तोडफोड केली. ही सर्व घटना घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. पराग शाह हे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले.

भाजपाने आज चौथी यादी जाहीर झाली. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेतील नेते माजी मंत्री एकनाथ खडसे, विनोद तावडेसह प्रकाश मेहता, राज पुरोहितांचा पत्ता अखेर कट करण्यात आला. या यादीत मुक्ताईनगरमधून खडसेंच्या जागी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र भाजपामध्ये उमेदवारीवरू बंडाळी दिसून येत आहे.

बोरीवलीतून विनोद तावडेंच्या जागी सुनिल राणे आणि घाटकोपर पूर्वमधून प्रकाश मेहतांच्या जागी पराग शहांना तिकीट देण्यात आले आहे. कुलाबामधून राज पुरोहितांच्या जागी राहूल नार्वेकर यांना तिकीट दिले. यामुळे भाजपच्या या ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments