Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईभाजप आमदार मंगलप्रभात लोढा देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर

भाजप आमदार मंगलप्रभात लोढा देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर

Mangal Prabhat Lodhaमुंबई : मुंबई भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा हे देशातील सर्वांत श्रीमंत बांधकाम व्यावसायिक ठरले आहेत. लोढा व त्यांच्या परिवाराची एकूण संपत्ती ३१,९६० कोटी रुपयांवर पोहोचली असून चालू वर्षात त्यात १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ग्रोहे हुरुन इंडियातर्फे केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती देण्यात आली आहे.

ग्रोहे हुरुन इंडियातर्फे केलेल्या सर्वेक्षणात डीएलएफचे राजीव सिंग व एम्बॅसी समूहाचे संस्थापक जितेंद्र विरवाणी हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. १०० जणांच्या या सूचीतील सर्व बांधकाम व्यावसायिकांच्या एकूण मालमत्तेच्या तुलनेत लोढा यांची मालमत्ता १२ टक्के आहे.

ग्रोहे हुरुन इंडियातर्फे देशभरातील बांधकाम व्यावसायिकांचा ३० सप्टेंबर अखेरिस असलेल्या संपत्तीचा आढावा घेण्यात आला. ज्यात अव्वल स्थानी मंगल प्रभात लोढा आहेत. लोढा कुटुंबियांच्या संपत्तीत २०१९ मध्ये १८ टक्क्यांची वाढ झाली आहे. या यादीतील उर्वरीत ९९ लोकांच्या तुलनेत लोढा कुटुंबियांच्या संपत्तीचा वाटा ९९ टक्के आहे. दुसऱ्या स्थानावर ‘डीएलएफ’चे राजीव सिंग असून त्यांची संपत्ती २५,०८० कोटी आहे. २०१८ च्या तुलनेत सिंग यांची संपत्तीत ४२ टक्क्यांची वृद्धी झाली आहे. एम्बॅसी समूहाचे संस्थापक जितेंद्र विरवाणी यांच्याकडे २४ हजार ७५० कोटींची संपत्ती आहे. या यादीत हिरानंदानी समूहाचे प्रमुख डॉ. निरंजन हिरानंदानी चौथ्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती १७,०३० कोटी आहे. पाचव्या स्थानावर के. रहेजा समूहाचे चंद्रू रहेजा आणि कुटुंबिय असून त्यांची संपत्ती १५,४८० कोटी आहे.

टॉप १० श्रीमंत बिल्डर त्यांची संपत्ती कोटींमध्ये…

मंगल प्रभात लोढा लोढा डेव्हलपर्स ३१,९६०
राजीव सिंग ‘डीएलएफ’ २५,०८०
जितेंद्र विरवाणी एम्बॅसी समूह २४,७५०
डॉ. निरंजन हिरानंदानी हिरानंदानी समूह १७,०३०
चंद्रू रहेजा के.रहेजा १५,४८०
विकास ओबेरॉय ओबेरॉय रियल्टी १३,९१०
राजा बागमाने बागमाने डेव्हलपर्स ९,९६०
सुरेंद्र हिरानंदानी हाऊस ऑफ हिरानंदानी, सिंगापूर ९,७२०
सुभाष रुणवाल रुणवाल डेव्हलपर्स ७,१००
अजय पिरामल पिरामल रियल्टीज ६,५६०

१०० पैकी ३७ बिल्डर मुंबईत राहतात…

‘ग्रोहे हुरुन’ च्या देशरातील १०० सर्वात श्रीमंत बिल्डरांपैकी अव्वल १० बिल्डरांपैकी ६ बिल्डर मुंबईतील आहेत. या यादीतील १०० पैकी ३७ बिल्डर मुंबईत राहत आहेत. स्थावर मालमत्ता क्षेत्रात जगातील सर्वात महागड्या शहरांपैकी एक म्हणून मुंबई शहराची ओळख आहे. मागील काही वर्षांमध्ये मंदीने घरांची विक्री कमी झाली असून स्थावर मालमत्ता उद्योग संकटात सापडला आहे. दिल्ली आणि बंगळूरमध्ये यादीतील प्रत्येकी १९ बांधकाम व्यावसायिक राहतात. मात्र बांधकाम व्यावसायिकांची हजारो कोटींची संपत्ती अचंबित करणारी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments