Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईभाजपमध्ये मोठा भूकंप येणार; 'या' मंत्र्याचा दावा

भाजपमध्ये मोठा भूकंप येणार; ‘या’ मंत्र्याचा दावा

Nitin Raut,Congress,BJP,Raut,Nitinमुंबई : महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशनाच्या वेळी भाजपमध्ये भूकंप होणार आहेत, असा दावा बांधकाम मंत्री काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांनी केला आहे. यामुळे भाजपमध्ये मोठं भगदाड पडण्याची चिन्हे आहेत.

भाजपमध्ये सध्या पंकजा मुंडेंसह, एकनाथ गायकवाड, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नेते नाराज आहेत. गुरुवारी पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी भाजपवर तोफ डागली. पंकजा मुंडे यांनी तर मी यापुढे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करणार असल्याचे सांगितले होते. तर एकनाथ खडसे म्हणाले होते यापुढे मी भाजपात असणार की नाही याचा भरवा नाही असा स्पष्ट संकेत दिला.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची भेट घेतलेली आहे. हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबर पासून सुरु होणार असल्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. नामदार नितीन राऊत यांनी दावा केला आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनीसुध्दा भाजपचे आमदार, नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा केल्यामुळे भाजपचे बरेच नेते पक्षातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला मोठं भगदाड पडण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments