Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमुंबई महापालिका निवडणूक भाजप स्वत:च्या ताकदीवर जिंकेल : चंद्रकात पाटील

मुंबई महापालिका निवडणूक भाजप स्वत:च्या ताकदीवर जिंकेल : चंद्रकात पाटील

Chandrakant Patilमुंबईत 2022 ची महापालिका निवडणूक ही भाजप स्वत:च्या ताकदीवर जिंकेल. ही निवडणूक जिंकण हे आमच उद्धिष्टं आहे. मुंबईचा पुढील महापौर हा भाजपचाच असेल,” असा संकल्प बैठकीत केला आहे असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

मुंबईत एकूण 10 हजार बुथ आहेत. त्यामुळे प्रत्येक बुथ घेऊन आम्ही त्यावर बुथ समिती, वॉर्ड अध्यक्ष यावर चर्चा केली. ही सर्व चर्चा येत्या 30 डिसेंबरपर्यंत संपेल. त्यानंतर काही ठिकाणी फेरनियुक्ता तर काही ठिकाणी नवीन नियुक्ती होईल, असेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

15 डिसेंबरपर्यंत वॉर्ड अध्यक्षांच्या निवडणुका होतील. तर 20 डिसेंबरपर्यंत विधानसभेनुसार अध्यक्ष, 25 डिसेंबरपर्यंत जिल्ह्यानुसार अध्यक्षांच्या निवडणुका होतील. तर त्यानंतर 30 डिसेंबरपर्यंत मुंबईचा अध्यक्ष घोषित होईल.” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच “मुंबईच्या अध्यक्षांची घोषणा होताना केंद्राचे नेते मुंबईत येतील.” असेही ते म्हणाले.

दरम्यान “येत्या 1 ते 5 जानेवारीपर्यंत प्रदेशाध्याची घोषणा होईल. यानंतर केंद्रीय अध्यक्षासाठीचे वेळापत्रक लागेल” असेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments