Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईनाचक्की: ट्विटर फॉलोअर झाले एक लाख, भाजपाने सांगितले दहा लाख!

नाचक्की: ट्विटर फॉलोअर झाले एक लाख, भाजपाने सांगितले दहा लाख!

मुंबई : महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटर हॅण्डलला फॉलो करणाऱ्यांची संख्या एक लाख इतकी आहे. मात्र प्रसिद्धीच्या मोहात असलेल्या भाजपने चक्क दहा लाख लोक भाजपाला ट्विटरवर फॉलो करत असल्याचा दावा करत त्यांचे आभार मानले. नेटिझन्सनी प्रतिक्रियांमधून शाळाघेतल्यानंतर त्यांना आपली चूक लक्षात आली आणि आधीची पोस्ट त्यांनी डिलीट करून टाकली. भाजपाचं गणित कच्चं की, फॉलोअर्स जास्त दाखवण्यासाठी थापा मारल्याची उलटसुलट चर्चा सुरु आहे.

या चुकीच्या ट्विटमुळे महाराष्ट्र भाजपाला टीकेला सामोर जावे लागत आहे. नेटीझन्सनी त्यांचा खरपूस समाचार घेतला. हे ट्विट भाजपाने हटवले असले तरी त्याचे प्रिंट स्क्रीन सोशल मीडियावर व्हायरल झालेत.  गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेचे गणित जुळवण्यात माहीर असलेल्या भाजपचं गणित कच्चं असल्याचं एका पोस्टमुळे समोर आलं आहे. भाजपाच्या या कारणाम्यामुळे चांगलीच गोची झाली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाषणातून इतिहासाचे दाखले देतांना चुकीच्या तारखा व नावांचा संदर्भ आपल्या जाहीर सभांमधून दिला आहे. त्यावेळी भाजपाची चांगलीच नाचक्की झालेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments