Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईBMC: सहआयुक्त पाणी समजून सॅनिटायझर प्यायले...

BMC: सहआयुक्त पाणी समजून सॅनिटायझर प्यायले…

मुंबई: मुंबई महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवार पाणी समजून सॅनिटायझर प्यायलाचा प्रकार समोर आला आहे. मुंबई महापालिकेचं बजेट आज सादर केला जात असून यावेळी हा प्रकार घडला. शिक्षण बजेट मांडलं जात असताना पाण्याची बाटली समजून रमेश पवार यांनी सॅनिटायझरची बाटली उचलली आणि प्यायले. यावेळी उपस्थितांनीही सॅनिटाझर प्यायलं असल्याचं त्यांच्या लक्षात आणून दिलं. यानंतर काही वेळासाठी ते तिथून बाहेर पडले आणि नंतर पुन्हा येऊन कामकाजात सहभागी झाले.

नुकतंच यवतमाळमध्ये असा काहीसा प्रकार घडला आहे. पोलिओ लसीकरण मोहिमेदरम्यान चिमुकल्यांना पोलिओच्या लसीऐवजी चक्क सॅनिटायझर पाजण्यात आल्याची संतपाजनक घटना घाटंजी तालुक्यातील भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कापसी (कोपरी) येथे घडली आहे. सॅनिटायझर पाजल्यामुळे प्रकृती बिघडल्याने १२ बालकांना रविवारी रात्री यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यासह दोन आरोग्य कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव चौकशी समितीने दिला आहे.

मुंबई महापालिकेचा २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर होत आहे. करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे वाढलेला खर्च आणि टाळेबंदीमुळे घसरलेले उत्पन्न यामुळे पालिकेचा जमा-खर्चाचा ताळमेळ बिघडलेला आहे. त्यातच मार्च २०२२ मध्ये येऊ घातलेल्या पालिकेच्या निवडणुकांमुळे आर्थिक शिस्त लावणे प्रशासनाला शक्य होणार नाही. या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व आहे. करवाढ, नवीन शुल्क किं वा शुल्कवाढ करणार यासोबतच अर्थसंकल्प तुटीचा की शिलकीचा याकडेही लक्ष असणार आहे.

श्रीमंत महानगरपालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती गेल्या काही वर्षांपासून खालावू लागली आहे. जकात बंद झाल्यानंतर महसुलाचे नवे मोठे स्रोत उभे करण्यात अपयश आल्यामुळे पालिकेची अवस्था डळमळीत होऊ लागली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातील ४८ टक्के निधी खर्च झाला आहे, तर दुसरीकडे उत्पन्न मात्र ४० टक्के च जमा झाले आहे. मालमत्ता कर, विकास नियोजन या मुख्य स्रोतातून अपेक्षित उत्पन्नाचे लक्ष्य पालिके ला गाठता आलेले नाही. ८० हजार कोटींच्या पालिकेच्या ठेवी असल्या तरी दैनंदिन खर्च भरून काढणे दिवसेंदिवस मुश्कील होऊ लागले आहे. त्यातच कर्ज रोखे उभारून चार हजार कोटींचा निधी उभारावा लागणार असल्याच्या चर्चेमुळे पालिकेच्या आर्थिक स्थितीबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments