Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनअभिनेत्री जीनत अमानच्या तक्रारीवरुन व्यावसायिकाला अटक!

अभिनेत्री जीनत अमानच्या तक्रारीवरुन व्यावसायिकाला अटक!

zeenat aman

मुंबई: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जीनत अमाननं जुहू पोलीस ठाण्यात एका व्यावसायिकाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आता हे प्रकरण क्राइम ब्रँचकडे सोपवण्यात आलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

एकेकाळी गाजलेली अभिनेत्री जीनत अमान हिला महिन्याभरापासून हा व्यावसायिक त्रास देत होता. तसेच तो धमकावत असल्याचाही आरोप जीनतनं केला होता. त्या व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी धमकी देत असल्याच्या आरोपाखाली आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जीनत अमाननं ३० जानेवारीला  मुंबईतल्या एका व्यावसायिकावर पाठलाग करणं आणि धमकावण्याचा आरोप केला होता. पोलिसांत दाखल असलेल्या तक्रारीनुसार, मुंबईतले व्यावसायिक सरफराज ऊर्फ अमन खन्ना (३८) जीनत अमानचा गेल्या अनेक दिवसांपासून पाठलाग करत आहेत. आरोपी जीनत अमानला व्हॉट्सअॅपवर अश्लील मॅसेजही पाठवतो. त्याच्यावर अभिनेत्रीच्या घरी जाऊन अत्याचार करणे आणि सुरक्षारक्षकाला मारहाण करण्याचाही आरोप आहे. पोलिसांनी सरफराजविरोधात ३५४ (डी) आणि महिलेला खुलेआम धमकी देण्याविरोधात ५०९ आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ANI

✔@ANI

Actor Zeenat Aman registers a rape case against a businessman at Juhu Police Station. Accused has been arrested and will be produced in court today. Further investigation underway. #Mumbai

12:44 PM – Mar 23, 2018

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments