Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईभाई जगताप म्हणाले, राजकारणातून निवृत्ती घेईल!

भाई जगताप म्हणाले, राजकारणातून निवृत्ती घेईल!

Bhai jagtap congress
मुंबई : काँग्रेस नेते भाई जगताप यांनी ईव्हीएम विरोधात तक्रार दाखल केली. युतीचे उमेदवार निवडून आलेल्या २५ जागांवर बॅलेट पेपरच्या सहाय्यानं निवडणुका घेण्यात याव्या. बॅलेट पेपरवरील निकाल आणि ईव्हीएमवरील निकाल सारखा लागल्यास पुन्हा हा मुद्दा उपस्थित करणार नाही. राजकारणातून निवृत्ती घेईल असे भाई जगताप यांनी जाहीर केले.

काँग्रेसचे नेते भाई जगताप कुलाबा मतदारसंघातून निवडणूक लढवली. भाई जगताप यांनी ईव्हीएम विरोधात तक्रार दाखल केली आहे. १८ सीलबंद करण्यात आलेले ईव्हीएम स्ट्राँगरूम ऐवजी अन्यत्र ठेवण्यात आले होते. मॉक पोल झालेल्या ईव्हीएमची व्हीव्हीपॅटसोबत पडताळणी आवश्यक असते. मात्र, कर्मचाऱ्यांना याची माहिती देण्यात आली नाही. पडताळणीपूर्वीच ९ मशीन सील करण्यात आल्या होत्या. याबाबत निवडणूक आयोगानं खुलासा करावा, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.

ईव्हीएम विरोधात शंका…

देशभरात ईव्हिएम बाबत विविध पक्षाच्या नेत्यांनी शंका उपस्थितीत केली होती. तसेच ईव्हिएम बॅन करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. काही ठिकाणी आंदोलने करण्यात आली. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments