Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रभायखळा - सीएसएमटीमधील पूल ‘या’ कारणामुळे बंद!

भायखळा – सीएसएमटीमधील पूल ‘या’ कारणामुळे बंद!

csmt foot over bridgeमुंबई :  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि भायखळा स्थानकातील पादचारी पूल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. भायखळा पुलाची दुरुस्ती ७ फेब्रुवारी ते ६ मार्चदरम्यान, तर सीएसएमटी पुलाची दुरुस्ती ८ ते २५ फेब्रुवारी या कालवधीत करण्यात येणार आहे. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी मुंबई दिशेकडील पादचारी पुलाचा वापर करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

पादचारी पूल तब्बल एक महिना बंद राहणार...

भायखळा स्थानकातील कल्याण दिशेकडील फ्लॅटफॉर्म क्रमांक १, २, ३, ४ ला जोडणारा पादचारी पूल तब्बल एक महिना बंद राहणार आहे. शुक्रवार, ७ फेब्रुवारीपासून या पुलाची दुरुस्ती सुरू होणार आहे. दोन टप्प्यांत या पुलाचे काम करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात फ्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि ४ वरील पुलाचा भाग बंद करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात फलाट क्रमांक १ आणि २वरील पुलाच्या पायऱ्या दुरुस्तीसाठी बंद करण्यात येणार आहेत. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी मुंबई दिशेकडील पादचारी पुलाचा वापर करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  पादचारी पूल…

८ फेब्रुवारीपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस फलाट क्रमांक ६ आणि ७ वरील पादचारी पुलाच्या पायऱ्या दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. यामुळे सीएसएमटीतील फ्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील प्रवेशद्वारातून प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना वळसा घालून फ्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ वर पोहोचावे लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments