Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईजय श्री राम म्हणायचे, वचन तोडायचे हे माझं हिंदुत्व नाही : मुख्यमंत्री

जय श्री राम म्हणायचे, वचन तोडायचे हे माझं हिंदुत्व नाही : मुख्यमंत्री

uddhav thackerayमुंबई: जेव्हा युती नव्हती तेव्हा आम्ही विरोधात होतो. त्यावेळीही आमचं हिंदुत्व होतं, आजही आहे, काल ही होत आणि उद्याही ते राहिलं. पण त्या हिंदुत्वामध्ये दिलेला शब्द पाळण हेसुद्धा माझं हिंदुत्व आहे. जय श्री राम म्हणायचे आणि दिलेले वचन तोडायचे हे माझं हिंदुत्व नाही. असा टोला मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

विधानसभेच्या अध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड झाल्यानंतर विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांनी त्यांचं अभिनंदन केलं. पण जर “तुम्ही माझ्यासोबत असता ना, तर मी हा सर्व कारभार टीव्हीवर बसून बघितला असता” असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहादरम्यान भाषणातून लगावला.

गेल्या पाचवर्षात मी सरकाराला दगा देण्याचा प्रयत्न केला नाही. तुमच्या चांगल्या कामाआड माझी शिवसेना, माझा पक्ष येऊ दिला नाही. सर्व सहकारी आजही माझ्यासोबत आहे. त्यांनी ही मी सक्त ताकीद दिली होती. जे बोलायचे ते स्पष्ट बोलायचे कपट कारस्थान आणि काळोखात काही बोलायचे नाही. मध्यरात्रीचे खलबंत करायची नाही. असा टोलाही मुख्यमं ठाकरेंनी फडणवीसांना लगावला. पण महाराष्ट्राच्या जनतेसाठी जर मला रात्रीचे बसायला लागलं तरी माझी सर्व तयारी आहे. असेही ते पुढे म्हणाले.

“देवेंद्र फडणवीस तुमच अभिनंदन. आपण गेली 20-25 वर्षे एकत्र आहोत. आपला परिचय आज माझ्या हातात आला. तो आधी असता तर बर झालं असतं. कारण या दिवसाची या नात्याची मला अपेक्षा नव्हती.” असेही ते म्हणाले.

“एका दृष्टीने पाहिलं तर मी आतापर्यंतचा नशिबवान किंवा भाग्यवान मुख्यमंत्री आहे. कारण जे 25-30 वर्षे विरोधात होते ते माझे मित्र झालेत. आणि जे मित्र होते ते विरोधात बसलेत. म्हणून प्रामाणिकपणे वाटत की विरोधी पक्ष अस्तित्वात राहणार नाही कारण विरोधी पक्ष माझे मित्र आहेत.” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments