Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमुंबईत सिटी बँकेच्या ९१ हजार खातेदारांचा मतदानावर बहिष्कार

मुंबईत सिटी बँकेच्या ९१ हजार खातेदारांचा मतदानावर बहिष्कार

The City Co-operative Bank,City Bank,Citi Bank
मुंबई: सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये घोटाळ्यामुळे मुंबईत ९१ हजार खातेधारक अडचणीत आले आहेत. त्यामुळे संतप्त खातेधारकांनी मतदानावर बहिष्कार टाकून सरकारचा निषेध व्यक्त केला.

सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष व शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या कार्यकाळात बँकेत गैरव्यवहार झाला होता. रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादून दीड वर्ष उलटले तरी बँकेला डबघाईला आणणाऱ्यांवर कोणतीच कारवाई करण्यात येत नसल्याने तसेच बँकेचे विलीनीकरण करण्यात टाळाटाळ केली जात असल्याने त्याचा निषेध करत बँकेच्या खातेधारकांनी आज मतदानावर बहिष्कार टाकला तर काही ग्राहकांनी नोटाचा पर्याय वापरला. या बँकेच्या मुंबईत १० शाखा असून सुमारे ९१ हजार खातेधारक आहेत.

पीएमसी बँकेप्रमाणेच सिटी कॉ-ऑपरेटिव्ह बँकेवर एप्रिल २०१८ मध्ये रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले होते. कर्जवाटपातील अनियमितता आणि थकीत कर्जवसुली यामुळे ३५-अ कलमानुसार रिझर्व्ह बँकेने या सहकारी बँकेवर कारवाई केली होती. त्यामुळे या बँकेत आपल्या आयुष्याची पुंजी ठेवणाऱ्या हजारो खातेधारकांची आर्थिक कोंडी झाली होती. जून महिन्यापर्यंत बँकेचे विलीनीकरण पूर्ण होण्याची अपेक्षा यावेळी अनासकर यांनी बोलून दाखवली होती तर उद्धव ठाकरे यांनीही आपण याचा पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप काहीच हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे ग्राहाकांनी मतदानावर बहिष्कार टाकून निषेध व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments