Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईपीएमसी बँक घोटाळाप्रकरणी काँग्रेस नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी काँग्रेस नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

PMC bank account holderमुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक (पीएमसी) प्रकरणी आज राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. यावेळी राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले. या शिष्टमंडळात मुंबई काँग्रेसचे माजी खासदार अध्यक्ष एकनाथ गायकवाड माजी आमदार भाई जगताप यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

आज पीएमसी बँक प्रकरणी सुनावणी पुढे ढकल्याने खातेदारांनी न्यायालयाबाहेर घोषणाबाजी केली होती. यावेळी संतप्त खातेदारांनी ‘आरबीआय चोर है’ अशा घोषणा देखील दिल्या होत्या. आज सुनावणी असल्याने मुंबई उच्च न्यायालयाबाहेर पीएमसीच्या खातेदारांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती. या सुनावणीत काय होणार? याकडे खातेदारांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान ही सुनावणी ४ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आरबीआय विरोधात खातेदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.

पीएमसी बँकेच्या घोटाळ्यानंतर आरबीआयने खातेदारांना त्यांच्याच खात्यातून पैसे काढण्यासंदर्भात निर्बंध घातले होते. त्यामुळे खातेदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. पीएमसी बँकेतील खातेदारांना तातडीने पैसे मिळावेत आणि त्यांना त्यांचे लॉकर हाताळता यावेत यासाठी एक नियमावली करण्यात यावी अशी विनंती, शिवसेनेकडून करण्यात आली होती. त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments