Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईकाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस विरोधीपक्षातच बसणार : शरद पवार

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस विरोधीपक्षातच बसणार : शरद पवार

Sharad pawar shivsena cm

युतीला सत्तास्थापनेचा जनादेश मिळाला आहे. आमची सत्तास्थापनेत कोणतीही भूमिका नसेल, आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणूनच काम करू, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनीही हीच भूमिका मांडली आहे. यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे शिवसेनेला पाठिंबा देणार नाही. व राज्यात विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांची भूमिका आता स्पष्ट झाली आहे.

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर शरद पवार यांनी आम्ही सत्ता स्थापन करणार नसल्याचे स्प्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments