Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमुंबईमध्ये कोरोनाचा पहिला बळी!

मुंबईमध्ये कोरोनाचा पहिला बळी!

India's first coronavirus death confirmed in Karnatakaमुंबई : कोरोनाचा जगभरात हैदोस सुरु आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे ३९ रुग्ण झाले आहेत. मुंबईमध्ये ६४ वर्षीय कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रा अगोदर कर्नाटक, दिल्लीमध्ये कोरोनाचा बळी गेला होता. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

देशात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मुंबईतही अनेक रुग्णांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. मात्र आतापर्यंत राज्यात एकही मृत्यू झाला नव्हता. करोनामुळे मृत्यू होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना ठरली.

मुंबईसह राज्यभरात करोनाची भीती वाढत असतानाच शनिवारी कोरोनाची लागण झालेल्या कल्याणमधील एका रुग्णाची पत्नी (३७) आणि तिच्या तीन वर्षीय मुलीलाही या विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments