Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईकल्याणमध्ये नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याने भाजपच्या तंबूत घबराहट

कल्याणमध्ये नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याने भाजपच्या तंबूत घबराहट

Minister Eknath Shinde BJP Sena kalyan
मुंबई : कल्याणची जागा भाजपाला दिल्याने सेना-भाजपामध्ये स्थानिक पातळीवर वाद निर्माण झाला. कल्याण डोबिंवलीमधील शिवसेनेच्या नगरसेवक आणि अनेक पदाधिराऱ्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केले. त्यामुऴे नाराज शिवसैनिकांचा कल्याणमध्ये भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने नाराज असणाऱ्यांचा राग दूर करून त्यांची समजूत काढण्याचे आदेश ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले असून या संबंधित प्रकरणात लक्ष देण्यासही सांगितले आहे. विधासभा निवडणुकीकरता शिवसेना सज्ज असताना कल्याणची जागा भाजपाला दिल्याने सेना-भाजपामध्ये स्थानिक पातळीवर वाद-विवाद सुरूच आहे. परंतु शिंदे यांनाही सेनेच्या पदाधिका-यांची मनधरणी करण्यात यश मिळाले नाही. त्यामुळे सेनेमध्येही गटबाजी उफाळली असल्याचे चित्र आहे.

कल्याण-डोबिंवली तसेच उल्हासनगर महापालिकेतील २६ नगरसेवकांसह ३०० कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपले राजीनामे दिले आहेत. या सर्व परिस्थितीमुळे ठाणे जिल्ह्यातून सेनेचा नाराजीचा सूर पाहायला मिळत असून जागा आणि तिकिटवाटपावरून तेथील स्थानिक नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments