होम महाराष्ट्र उत्तर महाराष्‍ट्र मराठमोळ्या तेजस्विनीने राष्ट्रकुल स्पर्धेतलं पदक शहीद जवानाला केलं समर्पित

मराठमोळ्या तेजस्विनीने राष्ट्रकुल स्पर्धेतलं पदक शहीद जवानाला केलं समर्पित

34
0

Tejaswini, Kiran Thoratमहत्वाचे…
१. वयाच्या २२ वर्षी तो पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात शहीद झाला इतकच समजलं
२. तेजस्विनीचे आजोबा हे भारतीय सैन्यात होते. तर तेजस्विनीच्या वडिलांनी काहीकाळा भारतीय नौदलात काम केलं
३. तेजस्विनीच्या या भूमिकेने एक वेगळा आदर्श निर्माण केला


मुंबई: ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंतने रौप्य आणि सुवर्ण पदकाची कमाई केली. भारतात परतल्यानंतर सर्व खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत असताना, तेजस्विनी सावंतने आपल्याला मिळालेलं पदक, पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेला औरंगाबादचा जवान किरण थोरातला समर्पित करुन वेगळा आदर्श निर्माण केला.  

तेजस्विनी सावंतने आपले पती समीर दरेकर आणि परिवाराला कौतुक सोहळा घेऊ नका. असं स्पष्ट शब्दांत बजावलं होतं.“मला किरणबद्दल फारशी माहिती नाही. मात्र वयाच्या २२ वर्षी तो पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात शहीद झाला इतकच समजलं. देशासाठी त्याने केलेली कामगिरी ही शब्दात सांगता येऊ शकत नाही”, असं म्हणत तेजस्विनीने किरण थोरातला श्रद्धांजली वाहिली. तेजस्विनी २० एप्रिल पासून दक्षिण कोरियात होणाऱ्या फेडरेशन नेमबाजी विश्वचषकात सहभागी होणार आहे.“सैनिकांशी हस्तांदोलन करताना एका क्षणानंतर मला अक्षरशः रडायला येत होतं. कित्येत जवान तरुण वयात देशासाठी लढताना शहीद होतात, कित्येक जणांना कायमचं अपंगत्व येतं. राष्ट्रकुलमध्ये पदक जिंकल्यानंतर जी भावना माझ्या मनात होती तीच भावना आता माझ्या मनात आहे.” तेजस्विनी सावंतने इंडियन एक्स्प्रेसशी बोलतांना म्हणाली.

तेजस्विनी सावंत आणि भारतीय सैन्य दलाचं एक अतुट नातं आहे. तेजस्विनीचे आजोबा हे भारतीय सैन्यात होते. तर तेजस्विनीच्या वडिलांनी काहीकाळा भारतीय नौदलात काम केलं आहे. आपल्यालाही सैन्यात भरती होण्यासाठी संधी समोर आली होती, मात्र मला परिवाराला सोडून राहणं शक्य नसल्याने मी पुढे सैन्य दलात गेले नाही, तेजस्विनी सावंतने आपल्या आठवणींना उजाळा दिला. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये तेजस्विनी सावंतने ५० मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात सुवर्ण पदक तर ५० मी. रायफल प्रोन प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली आहे.