Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्र‘धारावी कोरोना नियंत्रण : लोकसहभागाचे उदाहरण’

‘धारावी कोरोना नियंत्रण : लोकसहभागाचे उदाहरण’

India's first coronavirus death confirmed in Karnatakaधारावी येथील कोरोनाची बिकट स्थिती सामुहिक प्रयत्नांतून नियंत्रणात आणल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते मुंबई महानगरपालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

शासन कार्यासोबतच लोकसहभाग तसेच अशासकीय संस्थांचे योगदान यामुळे धारावी येथील कोरोना संसर्ग नियंत्रित करणे शक्य झाले असे दिघावकर यांनी यावेळी सांगितले.

उदयपुरचे युवराज लक्ष्यराज सिंह मेवाड, बांधकाम व्यावसायिक तसेच शिक्षणसंस्था चालक निरंजन हिरानंदानी, पार्श्वगायक शान व गायिका पलक मुच्छल, अभिनेते अलि फजल व भामला फाउंडेशनचे अध्यक्ष आसिफ भामला यावेळी उपस्थित होते.

नानावटी रुग्णालयाचे डॉ समद अन्सारी, हिरानंदानी रुग्णालयाचे मुख्याधिकारी डॉ सुजित चटर्जी, विजय कारिया, सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, कमल खुशलानी, विनीत गौतम, त्रिवनकुमार कर्नानी, रोमांचक अरोरा, निक्सन जोसफ, नेल्सन कोएल्हो, बैद्यनाथचे आयुर्वेदचे अध्यक्ष सिद्धेश शर्मा, आर डी नॅशनल कॉलेजच्या प्राचार्या डॉ. नेहा जगतियानी, समाजसेवी एहसान गडावाला, अनुराग कत्रियार, धारावी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश नागरे याचा कोरोना काळातील कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments