Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईMumbai Covid l साकीनाका येथे स्वच्छता सुरक्षा साहित्यांचे वाटप

Mumbai Covid l साकीनाका येथे स्वच्छता सुरक्षा साहित्यांचे वाटप

मुंबई : राज्यात कोरोनाचा थैमान सुरुच आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर कुर्ला एल वॉर्ड येथील साकीनाका विभागात सफाई कर्मचाऱ्यांना पंचशील महिला मंडळ आणि त्रिरत्न प्रेरणा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता सुरक्षा साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, नगरसेवक वाजिद कुरेशी, सहायक अभियंता विशाल गंगणे, दिलीप कदम, दयानंद जाधव, सुभाष गायकवाड, मनाली गायकवाड, जानराव जाधव, हरिष झुंझारराव, संतोष रोकडे उपस्थित होते.

राज्यात काल दिवसभरात ३ हजार ७१७ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली असून, ७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, ३ हजार ८३ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ९३.४४ टक्के आहे. तसेच, राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १८ लाख ८० हजार ४१६ वर पोहचली आहे.

वाचा : भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा कोरोना पॉझिटिव्ह,मुंबई दौरा रद्द

सध्या राज्यात ७४ हजार १०४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर १७ लाख ५७ हजार ५ जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे. याशिवाय आतापर्यंत राज्यात करोनामुळे ४८ हजार २०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १७ लाख २ हजार ४५७ नमुन्यांपैकी १८ लाख ८० हजार ४१६(१६.७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख १२ हजार ५८७ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ४ हजार ४०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

वाचा : देशातील अर्धी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय?; कमल हासन यांचा सवाल

करोना प्रतिबंधासाठी किमान तीन कंपन्यांच्या लशीच्या आपत्कालीन वापरासाठी औषध नियंत्रकांकडूनआढावा घेतला जात असतानाच, येत्या ६ ते ८ महिन्यांत कोटय़वधी लोकांचे लसीकरण करण्याच्या मोहिमेची तयारी भारताने सुरू केली आहे.कोविड-१९ लशीच्या ६० कोटी मात्रा ३० कोटी भारतीयांना देण्यासाठी आमची निवडणूक यंत्रणा तैनात करण्यात येईल, असे सरकारने म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments