Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपकडून डॉ. कराडांना राज्यसभेची उमेदवारी,खडसेंचा पत्ता कट!

भाजपकडून डॉ. कराडांना राज्यसभेची उमेदवारी,खडसेंचा पत्ता कट!

Dr. Bhagwat Karad-Eknath Khadseमुंबई : भाजपने राज्यसभेसाठी आज दुसरी यादी जाहीर केली. त्यामध्ये औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, स्पर्धेत असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातून माजी खासदार उदयनराजे भोसले आणि रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी महापौर डॉ. भागवत कराड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमर साबळेसह अपक्ष भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे, एकनाथ खडसे यांच्या उमेदवारीची चर्चा होती. मात्र त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले, डॉ.भागवत कराड यांनी गुरुवारी (१२ मार्च) आपला राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या ७ खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. त्यामुले एप्रिल महिन्यातच राज्यसभेच्या या ७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. भाजपकडून कुणाला उमेदवारी मिळणार याविषयी अनेक नावांची चर्चा होती. यात भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, माजी खासदार उदयनराजे भोसले या तिघांची चर्चा होती. मात्र, उमेदवारांच्या घोषणेनंतर एकनाथ खडसेंचा पत्ता कट करण्यात आला आहे.

राज्यसभेसाठी महाविकास आघाडीला ४ जागा मिळणार आहे. तर राष्ट्रवादीच्या वाटेला २ जागा मिळणार आहे. या दोन्ही जागांपैकी एका जागेवर राष्ट्रवादीकडून शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसकडून माजी खासदार राजीव सातव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

अशी असते ही निवडणूक…

विधानसभेतील २८८ सदस्यांचा विचार करता कोणत्याही पक्षाला आपला एक उमेदवार राज्यसभेत पाठवायचा असेल तर त्यासाठी ३७ आमदरांची गरज आहे. भाजपकडे १०५  आमदार असून नऊ अपक्ष आमदरांचा त्यांना पाठिंबा आहे.

विधानसभेतील आमदारांच्या मतांच्या आधारावर राज्यसभेत उमेदवार पाठवले. जातात. विधासभेतील आमदार आपल्या पहिल्या पसंतीची मते उमेवारांना देतात. त्या आधारावर जर निर्णय होऊ शकला नाही. तर उमदेवारांना देण्यात आलेली दुस-या पसंतीची मते विचारात घेतली जातात.

हे आहेत राज्यसभा नियुक्तीसाठी निकष

राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची ३७ मतं आवश्यक आहेत. त्यामुळे आघाडीचे ४ तर भाजपचे २ उमेदवार सहज निवडून येतील. शिल्लक राहिलेल्या मतांमधून आणखी एक उमेदवार निवडून आणण्याचा आघाडीचा आणि भाजपचा प्रयत्न राहणार आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments