ड्रग्सचा विळखा आता गरिबाच्याही घरात : काँग्रेस नेते सचिन सावंत

मुंबईतील हायप्रोफाईल ड्रग्स रॅकेटबद्दल विचारणा करण्यासाठी जेव्हा आम्ही त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले, "समाजातील प्रत्येक घटकांमधून ड्रग्सचे निर्दालन व्हायला हवे. सगळ्यांचं लक्ष्य फक्त हायप्रोफाईल घटनांकडे असतं पण आम्ही गरिबांकडेही लक्ष्य वळवण्याचा प्रयत्न केला."

- Advertisement -

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी सोमवारी कांदिवली परिसरातील वेगवेगळ्या संस्थांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाला बरोबर घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांसह उत्तर मुंबई विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्तांची भेट घेतली आणि मुंबईतील झोपडपट्टी परिसरातील सुरू असलेला ड्रग्सचा फैलाव थांबवावा अशी मागणी केली आहे.

मुंबईतील झोपडपट्टी परिसरात ड्रग्सचा फैलाव वाढत चालला आहे. युवा पिढी ही देशाचे भविष्य आहे. ड्रग्स च्या फैलावाने देशाचे भविष्य उध्वस्त होत तर आहेच पण अनेक कुटुंबाच्या आशा आकांक्षा ही ध्वस्त होत आहेत. यामागे फार मोठे रॅकेट असून आता शाळेतील मुले ही लक्ष्य होत आहेत. मध्यमवर्गीय गृहनिर्माण संस्थामध्येही याचा प्रसार होत आहे, असे यांनी सांगितले.

या भेटीमध्ये पोईसर परिसरात नागरी संस्थांनी घेतलेले सह्यांचे अभियान व जनमानसाचा प्रतिसाद अतिरिक्त पोलिस आयुक्त राजीव जैन यांच्यासमोर दर्शविण्यात आला. सदर प्रकार हा अतिशय गंभीर असून पोलिस यावर कडक कारवाई करतील आणि मूळापासून ड्रग्सचे रॅकेट खणून काढून असे आश्वासन अतिरिक्त पोलिस आयुक्तांनी दिले.

- Advertisement -

प्रसारमाध्यमांशी बोलताना सचिन सावंत यांनी अनेक प्रश्नांवर प्रकाश टाकला. गुजरातमधील बंदरांमध्ये हजारो किलो ड्रग्स येत आहेत पण त्याच्या मूळाशी तपास यंत्रणा पोहोचत नाहीत. या ड्रग्सचा मुंबईतील समस्येशी संबंध आहे का? याच्या चौकशीची गरज आहे असे ते म्हणाले. भाजपाचा दृष्टीकोन या समस्येकडे पाहताना केवळ राजकीय आहे असेही ते म्हणाले. नार्कोटीक्स कंट्रोल विभाग केवळ ड्रग्स घेणाऱ्यांच्या मागे गेले काही महिने दिसला पण ड्रग्स पेडलर मात्र पकडले जात नाहीत याची खंत त्यांनी व्यक्त केली. लवकरच प्रत्येक झोपडपट्टीमध्ये नशामुक्ती केंद्र असावे या मागणीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे मागणी करु असे सावंत म्हणाले.

मुंबईतील हायप्रोफाईल ड्रग्स रॅकेटबद्दल विचारणा करण्यासाठी जेव्हा आम्ही त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले, ” ड्रग्स हा समाजाचा नाश करणारा विषय आहे. समाजातील प्रत्येक घटकांमधून ड्रग्सचे निर्दालन व्हायला हवे. सगळ्यांचं लक्ष्य फक्त हायप्रोफाईल घटनांकडे असतं पण आम्ही गरिबांकडेही लक्ष्य वळवण्याचा प्रयत्न केला.”

सदर शिष्टमंडळात माजी नगरसेवक राणा सिंह, मुंबई काँग्रेसचे सचिव आनंद राय, आर. पी. पांडे, रत्नाकर सिंह, सुनिल तिवारी, राकेश झा व काही नागरी संस्थांचे पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

 

Web Title: Drugscha vilakha ata garibachyahi gharat: Congress nete Sachin Sawant

- Advertisement -