Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमुंबईत पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत, हिंदमाता, सायन परिसरात साचले पाणी

मुंबईत पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत, हिंदमाता, सायन परिसरात साचले पाणी

मुंबई :मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गणपती आगनापासून सुरु झालेला पाऊस आता चांगलाच स्थिरावला आहे. मंगळवार दुपारपासून पासून सुरु झालेली पावसाची संततधार आज बुधवारीही सुरुच आहे. त्यामुळे मुंबई शहरांसह उपनगरांमध्ये सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

 

मुंबईच्या लाईफलाईन  म्हणून ओळखल्या जणाऱ्या रेल्वे सेवेवरही पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वे लाईन सुरळीत सुरु असली तरीमध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरुन अप आणि डाऊन दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत.

 

मुंबईमध्ये हिंदमाता थिएटर परिसरसायन आदी परिसरात सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरी सबवेखाली पाच ते सात फूट पाणी साचले आहे. तरअंधेरी,मालाडबोरिवली आदी ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. येथील लिंक रोड परिसरातील सखल भागातही चांगलेच पाणी साचले आहे. त्यामुळे रस्तेवाहतूकही विस्कळीत झाली असून,नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

 

दरम्यान नवी मुंबई परिसरातही पावसाची संततधार कायम आहे. ऐरोलीजुईनगरवाशीपनवेलनेरुळखारघरकामोठे परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. तरठाणे जिल्ह्यातही ठाणेकल्याणडोंबिवलीटिटवाळा आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे.

नागरिकांना सतर्कतेचा इशाराशाळांना सुट्ट्या

पावसाची संततधार कोसळत असल्यामुळे शासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तरसंभाव्य धोक्याची शक्यता विचारात घेऊन सावधानता म्हणून शाळांना सुट्टी दिली आहे. तसेचनागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देताना कामाशिवाय घराबाहेर पडून नका. जर अगदीच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असे म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments