Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईकबीर कला मंच, रिपल्बिकन, पॅंथरच्या कार्यालयावर पोलिसांच धाडसत्र?

कबीर कला मंच, रिपल्बिकन, पॅंथरच्या कार्यालयावर पोलिसांच धाडसत्र?

Mumbai Policeमुंबई: पुण्यातील एल्गार परिषदेप्रकरणी पुणे पोलिसांनी मंगळवारी पहाटे पासून पुणे, नागपूर या शहरांमध्ये छापेमारी केली. कबीर कला मंच, रिपब्लिकन पँथरच्या कार्यालयावर तसेच नक्षलवाद्यांचे खटले लढवणारे वकील अॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्या घरावर पोलिसांनी छापे टाकल्याचे माहिती समोर येत आहे.

पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषद झाली होती. त्यानंतर १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. याचे पडसाद राज्यात उमटले व राज्यातील दलित संघटनांनी ३ जानेवारी रोजी राज्यभरात बंदची हाक दिली. या घडामोडीनंतर पोलिसांनी कबीर कला मंचच्या चार आणि रिपब्लिकन पँथरच्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

जवळपास तीन महिन्यानंतर पुणे पोलिसांनी मंगळवारी पहाटे पासून छापेमारीला सुरुवात केली. पुणे, नागपूर तसेच मुंबईतही छापे टाकण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र, पोलिसांनी नेमके कुठे छापे टाकले याचा तपशील अद्याप जाहीर केलेला नाही. कबीर कला मंच, रिपब्लिकन पँथर आणि अॅड. गडलिंग यांच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आले आहे. गडलिंग यांचे घर नागपूरमध्ये असून त्यांच्या घरात पेनड्राईव्ह आणि लॅपटॉप तपासले जात आहेत.

चोरांच्या उलट्या बोंबा

संभाजी भीडे यांनी दंगली घडवल्या सरकारची त्यांना हाथ लावायची हिंमत नाही. मात्र कबीर मला मंच आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यालयांवर घरांवर धाडी टाकून सुडाचे राजकारण करत आहेत.सरकारला शांतता पाहिजे की काय पाहिजे असा आरोप भारिपचे अध्यक्ष माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments