Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईखळबळजनक : घाटकोपरमध्ये महिलेचा शीर नसलेला मृतदेह सापडला

खळबळजनक : घाटकोपरमध्ये महिलेचा शीर नसलेला मृतदेह सापडला

mumbai mother lover murderमुंबई : घाटकोपरमध्ये शीर नसलेला आणि पायाचा खालील भाग कापलेला महिलेचा मृतदेह सापडला. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

घाटकोपर पश्चिम येथे विद्याविहार एसटी वर्कशॉपच्या समोर बेडशीटमध्ये महिलेचा मृतदेह गुंडाळलेल्या अवस्थेत आढळला. नाल्याजवळ मृतदेह टाकून देण्यात आला होता. यावेळी मॉर्निंग वॉकसाठी दोन महिला जात असतांना सर्व प्रथम हा मृतदेह दिसून आला. वर्कशॉपच्या सुरक्षारक्षकांना यासंबंधी कळवलं. कर्मचाऱ्यांनी जवळ जाऊन पाहिलं असता बेडशीटवर रक्ताचे डाग असल्याचं लक्षात आलं. मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात नेण्यात आला. पीडित महिलेचं वय ३० ते ३५ वर्षाच्या आसपास असावं असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरु आहे. या बाबत पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments