Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईशेतक-यांना त्वरीत मदत मिळावी, काँग्रेस महाआघाडीची राज्यपालांकडे मागणी

शेतक-यांना त्वरीत मदत मिळावी, काँग्रेस महाआघाडीची राज्यपालांकडे मागणी

NCP Congress leaders meets governor,NCP,Congress,Ajit Pawar,Balasaheb Thorat,Bhagat Singh Koshyari,Jayant Patil,Chhagan Bhujbalमुंबई: राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. पीककर्ज, विज बिल माफ करावे. काळजीवाहू सरकारने जाहीर केलेली 10 हजार कोटींची मदत तुटपुंजी आहे. 33 हजार कोटीची भरपाई लागणार आहे. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता शेतक-यांना मदत करावी. यासह अनेक मागण्यासंदर्भात आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी चर्चा केली. काँग्रेस महाआघाडीतर्फ निवेदन दिले. अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

नुकसानीचे पंचना्मे त्वरीत करावे. तसेच पंचनाम्याची मुदत वाढून द्यावी. फळ बागांचे मोठे नुकसान झालेले आहे. मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे बोटी समुद्रात गेल्या नाहीत. मच्छिमारही संकटात सापडलेलं आहे. कोल्हापूर, सांगली साता-यातील पूरग्रस्तांना अद्यापही मदत नाही. ती मदत त्वरीत जाहीर करावी. शेतकरी पूर्णपणे मोडला आहे. मोडलेला शेतकरी सरकारही मोडू शकतो हे लक्षात घ्यायला हवं. असेही अजित पवार म्हणाले.

जनतेने युतीला कौलं दिला आहे. त्यांनी अद्यापही सरकार स्थापन केल नाही. त्यांच काय चालू आहे माहित नाही. मात्र जनता त्रस्त झाली आहे. आम्ही राज्यपालांना विनंती केली तुम्ही मदत करा. पुढे पाच दिवस पुन्ही पावसाचा अंदाज दिलेला आहे. अतिवृष्टीमुळे फळभाज्या महागल्या आहेत. त्याचा सर्वसामन्य जनतेलाही फटका बसला आहे. सर्व जनता अडचणीत आहे. असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. या वेळी दोन्ही पक्षातील नेते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments