Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईहिंदू धर्माच्या भावना दुखावल्या प्रकरणी शरजील उस्मानीवर गुन्हा दाखल करा: आ.अतुल भातखळकर

हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या प्रकरणी शरजील उस्मानीवर गुन्हा दाखल करा: आ.अतुल भातखळकर

मुंबई:  पुणे येथे 30 जानेवारी येथे एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाज सडलेला आहे असे वक्तव्य करुन तमाम हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या. समाजात तेढ निर्माण करण्याचे दुष्कृत्य केले आहे. त्याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली दिंडोशी पोलीस स्थानकात तक्रार दाखर करण्यात आली आहे.

2017 मध्ये एल्गार परिषदेमुळे भीमा कोरेगाव येथे मोठी दंगल झाली होती. संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले होते. या वर्षीच्या एल्गार परिषदेत सुध्दा मागच्या वेळी प्रमानेच केवळ समाजात तेढ निर्माण होईल आणि देशविघातक शक्तींना पाठबळ मिळेल. शरजील उस्मानी याने पुणे येथील एल्गार परिषदेत गरळ ओकली.

एल्गार परिषदेतील त्याच्या भडकाऊ व देशविघातक भाषणाचे फुटेज व पुरावे पोलीसांकडे असताना सुध्दा त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलीसांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता शरजील उस्मानी विरोधात देशद्रोहाचा गुन्हा करुन त्याला तात्काळ अटक करावी अशी आग्रही मागणी सुध्दा आ. भातखळकर यांनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकार सत्ते आल्यापासून अशा देशविघातक कृत्यांना पाठबळ देण्याचेच काम केले जात आहे. एल्गार परिषदेच्या आडून जाती तेढ निर्माण करायचा आणि आपली पोळी भाजून घेण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न होता. अशी घाणाघाती टीका आ. भातखळकर यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments