Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईअखेर पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर

अखेर पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर

P Chidambaram finally arrested by EDमुंबई: माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि गृहमंत्री पी. चिदंबरम यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 21 ऑगस्टला चिदंबरम यांना अटक करण्यात आली होती. पण कोठडी कायम राहणार आहे.

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी चिदंबरम यांना आधी सीबीआयने आणि नंतर ईडीने अटक केली होती. यासंदर्भात सीबीआयने केलेल्या अटकेच्या विरोधात जामीनासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने त्यांना १ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. मात्र, त्यासाठी कोर्टाने त्यांना अट देखील घालून दिली आहे.

परदेशात जाता येणार नाही…

चिदंमबरम यांना परदेशात जाता येणार नाही. त्यासाठी त्यांना त्यांचा पासपोर्ट न्यायालयाकडे जमा करावा लागणार आहे. तसेच, जेव्हा जेव्हा सीबीआयला आवश्यकता असेल, तेव्हा त्यांना चौकशीसाठी हजर व्हावं लागणार आहे. दरम्यान, चिदंमबरम यांना सीबीआयच्या अटकेमधून जामीन मिळाला असला, तरी ईडीच्या कोठडीत त्यांना २४ ऑक्टोबरपर्यंत राहावं लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments