Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमालाडमध्ये 'एमएम मिठाईवाला'च्या दुकानाला आग

मालाडमध्ये ‘एमएम मिठाईवाला’च्या दुकानाला आग

मुंबई: मुंबईत मालाड रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या प्रसिद्ध ‘एमएम मिठाईवाला’च्या दुकानाला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यावर यश आले.

आगीची घटना आज सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान घडली. घटनास्थळी धुराचे लोट पसरले होते, आगीमुळे आजूबाजूची ३/४ दुकाने जळून खाक झाली आहेत. मार्केट परिसर असल्यामुळे या भागात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.

आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, तसेच कोणतीही जीवितहानीबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, दुकानाचे मोठे नुकसान झाल्याचे समजते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments