Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई महानगर प्रदेशसह चार शहरातील दुकाने,कार्यालये ३१ मार्चपर्यंत बंद : मुख्यमंत्री

मुंबई महानगर प्रदेशसह चार शहरातील दुकाने,कार्यालये ३१ मार्चपर्यंत बंद : मुख्यमंत्री

Uddhav Thackeray: No support for Citizenship Bill until Shiv Sena's questions answeredमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू वगळता मुंबई महानगर प्रदेशसह, पुणे, नागपूर, पिंपरी चिचंवड येथील सर्व दुकाने, कार्यालये आज रात्री १२ वाजेपासून ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. पंधरा दिवस खूप काळजी घ्यावी लागणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परीषदेत दिली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५२ वर पोहोचली आहेत. हे एक युध्द आहेत. युध्द लढण्यासाठी सर्वांना सज्ज राहण्याची गरज आहे. लोकल, बस सेवा बंद करा असं काही लोकांना मला सांगितलं. परंतु ह्या मुंबईच्या रक्तवाहिन्या आहेत. त्यामुळे लोकल, बस सेवा बंद होणार नाही. फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. ही सुट्टी नाही. ही सुट्टी नाही. महत्वासाठी हिताचा निर्णय आहे. कंपन्यांनी किमान वेतन बंद करु नये. जीवनावश्यक वस्तू वगळता इतस सर्व सेवा बंद राहणार आहे. अत्यावश्यक सेवा सुरु राहणार. असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं.

मुंबई महानगर प्रदेशात येणाऱ्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, रायगड, नवी मुंबई, पालघरसह नागपूर, पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सर्व कार्यालये आणि दुकाने बंद राहतील. या बंदमधून अत्यावश्यक सेवा तेवढ्या वगळण्यात आल्या आहेत. यात अन्नधान्य, दूध, औषधे यांचा समावेश आहे. या शहरांमध्ये कुणाला काही संभ्रम असेल तर संबंधित जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्याशी बोलू शकतात, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

कामगारांचे पगार कापू नका…

यावेळी मुख्यमंत्र्यांनी असंघटीत क्षेत्रातील कामगारांचे पगार न कापण्याचे आवाहनही संबंधितांना केलं. ज्यांचे तळहातावर पोट आहे, असे असंख्य कामगार आहेत. बंदच्या निर्णयाने त्यांच्या अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या कामगारांचे वेतन कापू नका, त्यांना त्यांचं किमान वेतन द्या, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. करोना हे संकट आहे. संकटात माणूसकीच टिकते. ही माणूसकीच तुम्ही टिकवा. कामगारांना आधार द्या. या माणूसकीच्या आधारेच आपण युद्ध जिंकत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments