Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमाजी 'एसीपी' लोहणकर मनसेत, कल्याणमधून ‘कल्याण’ होणार का ?

माजी ‘एसीपी’ लोहणकर मनसेत, कल्याणमधून ‘कल्याण’ होणार का ?

former acp Jagadish Lohankar joins mns may contest from kalyan
Image: Facebook

कल्याण : माजी सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) जगदीश लोहणकर यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. लोहणकर हे मनसेच्या तिकीटावर कल्याण (पूर्व) मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. लोहणकर यांना उमेदवारी मिळाली तर त्यांचा कल्याण होईल का अशी चर्चा सुरु झाली आहे.

एन्कांटर स्पेशाली प्रदीश शर्मा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यापाठोपाठ माजी सहायक पोलीस आयुक्त लोहणकर यांनीही मनसेत प्रवेश केला. लोहणकर यांनी कल्याणमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहिलेले आहे. त्यावेळी ते ‘दबंग’ ऑफिसर म्हणून सर्वांना परिचित होते.

लोहणकर यांनी आज मनसे नेते काका मांदळे, उल्हास भोईर कस्तुरबा देसाई यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला.
कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना लोहणकर यांनी कायदा व सुव्यस्था राखण्याला मोठे प्राधान्य दिले होते.

लोहणकर यांना मनसेची उमेदवारी दिल्यास पक्षाला त्याचा फायदा होऊ शकतो, असे मनसे नेत्यांना वाटत असल्याने त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच लोहणकर यांनी मनसेमध्ये प्रवेश केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments