Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमाजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांचे निधन

माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांचे निधन

Arvind Inamdar,DGP,Director General of Police,Arvind,Inamdarमुंबई: राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक आणि उत्तर प्रदेश राज्यपालांचे सल्लागार म्हणून कार्याचा ठसा उमटवणारे अरविंद इनामदार यांचे मुंबईतील हरकिसनदास हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान आज पहाटे निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. कार्यक्षम पोलीस दल तयार करू शकलो नाही, याची अखेर पर्यंत अरविंदराव इनामदार यांना खंत होती.

इनामदार हे पोलीस दलात कार्यरत असले तरी ते मनाने अतिशय संवेदनशील होते. त्यांच्यातील माणूस कायम जागा होता. म्हणून त्यांनी जपलेली मूल्ये आणि माणुसकीशी कधीही तडजोड केली नाही. आपल्या भगवद्गीतेचा मोठा प्रभाव असल्याचे ते नेहमी सांगत. इनामदार साहित्य वर्तुळातही तितकेच लोकप्रिय होते. लेखक म्हणूनही ते सर्वांना परिचित होते. खुसखुशीत भाषा शैली, आणि विनोदबुद्दीमुळे ते ऐकणाऱ्यांच्या मनाची सहज पकड घेत असत.

अरविंद इनामदार यांची धडाकेबाज कामगिरी…

1.जळगाव सेक्स स्कँडल हे प्रकरण यशस्वीपणे हाताळले.
2.1987 साली मुंबई चे अतिरिक्त पोलीस आयुक्त असताना दाऊद इब्राहिमच्या                                    3.अड्ड्यावर छापा टाकून 300 कोटीचे सोनं जप्त केले.
4.छोटा शकिल, अरूण गवळी यांसारख्या कुख्यात गुंडांना अटक करून मुंबईतील गँगवॉर संपवले.
5.टाडा, मोक्का यासारखे महत्वाचे कायदे राज्यात लागू केले.
6.गव्हर्नमेंट स्टाफ कमिशनचे चेअरमन.
7.आंध्र प्रदेशात जाऊन नक्षलवादी चळवळीचा खात्मा.
8.उत्तरप्रदेशच्या राज्यपालांचे सल्लागार म्हणून काम.
9.श्रीमंत बाबासाहेब पुरंदरेंच्या ‘जाणता राजा’ नाटकाचे संकलक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.
10.आजपर्यंत सामाजिक कामासाठी व कर्तव्यदक्ष प्रामाणिक पोलीस अधिकार्यांचा गौरव यासाठी ‘अरविंद इनामदार फाउंडेशन’ च्या माध्यमातून ५० लाख रुपयांहून अधिक देणग्या दिल्या.

सर्वात महत्वाचे म्हणजे…

राज्यातील पोलीस दलाच्या ‘महासंचालक’ या सर्वोच्च पदावर असताना भ्रष्टाचार आणि राजकीय दबाव न पटल्याने जाहीरपणे मत मांडून राजीनामा देणारे भारतातील एकमेव पोलीस अधिकारी.

मुंबईत गँगवॉर उफाळून आलं होतं. ते लोक रस्त्यावर येऊन धडाधड गोळीबार करत होते. म्हणजे पोलीस नाही पण रस्त्यावरचे निरपराध लोक मरत होते. त्यावेळेस ते एस.ओ.एस.ची स्थापना केली होती. त्यात पहिल्यांदा ३५ ते ४० अधिकारी आणि कॉन्स्टेबल होते.

त्यांच्यासाठी त्यानी त्याकाळी बुलेटप्रुफ गाड्या आणि जॅकेट मागवली होती. त्यासाठी सरकारच्या मागे लागले. त्यांनी सरकारला सांगितलं की, जर या गँगस्टर्सचा सामना करायचा असेल तर त्यांच्यापेक्षा चांगली शस्त्र आपल्याकडे पाहिजेत. त्यांच्यापेक्षा आमच्या शिपायांचं मोटिव्हेशन चांगलं पाहिजे. त्यांचे पगार दीडपट केले.

1982 साली नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीचे प्राचार्य होते त्यावेळेस तिथे सुमारे १५ हजार झाडं लावली. पहिला अरविंद इनामदार यांनी खणला.

एक सिस्टीम तयार करू शकलो नाही, कायदे तयार करू शकलो नाही, एक मानसिकता तयार करू शकलो नाही, कार्यक्षम पोलीस दल तयार करू शकलो नाही, याची खंत अरविंदराव इनामदार यांना होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments