Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईरेल्वेचे खासगीकरण करुन उद्योजकांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव : मल्लिकार्जुन खर्गे

रेल्वेचे खासगीकरण करुन उद्योजकांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव : मल्लिकार्जुन खर्गे

mallikarjun kharge on governmentमुंबई: निती आयोगाने रेल्वे बोर्डाला पत्र लिहीले. देशातील १५० रेल्वे गाड्या आणि ५० रेल्वे स्थानकांच  खासगीकरण करण्याचा आदेश दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचा केलेला विश्वासघात असून, भारतीय रेल्वे खासगी उद्योजकांच्या घशात घालण्याचा डाव आहे. अशी घणाघाती टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना खर्गे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेला जाहीर आश्वासन दिले होते की, कोणत्याही परिस्थितीमध्ये रेल्वेचे खासगीकरण होऊ देणार नाही. रेल्वेवर त्यांचे अतिशय प्रेम असून बालपणीपासून आपला रेल्वेशी संबंध राहिला आहे. निती आयोगाने घेतलेला निर्णय हा मोदींनी जनतेला दिलेल्या वचनाचा भंग आहे. भारतीय रेल्वे ही गोरगरिबांच्या रोजगाराशी आणि उपजिवीकेशी जोडलेली जिवनवाहिनी आहे.

देशाच्या कानाकोप-यातील दुर्गम भागांना गोरगरिब वस्त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे काम रेल्वे करते. रेल्वे गरिब जनतेचे दळणवळणाचे हक्काचे साधन आहे. हेच साधन खासगी उद्योजकांच्या घशात घालून जनसामान्यांचा हक्क काढून घेण्याचे हे सुनियोजीत कारस्थान आहे. काँग्रेस पक्ष याचा निषेध आणि तीव्र विरोध करत आहे असे खर्गे म्हणाले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments