लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

- Advertisement -

मुंबई : थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आज विधानभवन येथील त्यांच्या पुतळ्यास विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार वैभव पिचड, विधानसभा अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर, विधिमंडळ सचिवालयाचे सचिव (कार्यभार) जितेंद्र भोळे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

- Advertisement -