Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमंत्रालयासमोर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न!

मंत्रालयासमोर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न!

मुंबई : आत्महत्यांचा केंद्र बनलेल्या मंत्रालया समोर  धर्मा पाटील यांच्या मृत्यूप्रकरणानंतर पुन्हा मंत्रालयासमोर आणखी एका व्यक्तीने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र वेळेवरच सुरक्षारक्षकांना ही गोष्ट लक्षात आल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न फसला. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली.

गुलाब शिंगारे  (वय ५०) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. व्यक्ती आपल्या जमिनी संदर्भात तक्रार घेऊन मुंईत दाखल झाले होते. शिंगारे मूळचे बीड जिल्ह्यातील माजलगावचे रहिवासी आहेत. त्यांच्या तक्रारीला योग्य उत्तर न मिळाल्यानं त्यांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.  शिंगारे यांचा हेतू लक्षात आल्यानंतर तत्काळ हस्तक्षेप करत मरीन ड्राईव्ह पोलिसांनी शिंगारे यांना ताब्यात घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments