Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमुंबई मनपाच्या ऐतिहासिक इमारतीचे सौंदर्य पाहण्याची संधी

मुंबई मनपाच्या ऐतिहासिक इमारतीचे सौंदर्य पाहण्याची संधी

मुंबई: बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या ऐतिहासिक इमारतीची दारे सामान्य जनतेसाठी उघडण्यात आली आहेत. शनिवारी 15 उत्साहित पर्यटकांच्या पहिल्या तुकडीला प्रतिष्ठित बीएमसी भवनात हेरिटेज वॉकचा आनंद लुटता आला. ही इमारत आशियातील सर्वात धनवान नागरी संस्था  असलेल्या बीएमसीचे मुख्यालय आहे. या ऐतिहासिक इमारतीत मुंबई आणि देशविदेशातून येणारे पर्यटक शनिवार आणि रविवारी हेरिटेज वॉक करू शकतील. या योजनेमुळे मुंबई आणि बीएमसीची गौरवशाली परंपरा आणि तिचा घटनाक्रम जाणून घेण्याची संधी सर्वसामान्यांना मिळणार आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी फुलांनी पर्यटकांचे स्वागत केले. सर्वात पहिल्या पर्यटकांना स्मृतिचिन्ह भेट म्हणून दिले गेले आणि या चमूत सामील असलेल्या सर्व पर्यटकांना बीएमसीचे 2021चे कॅलेंडर देण्यात आले. मुंबई मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सांगितले, “अशा प्रकारचे हेरिटेज वॉक आयोजित करणारी ही देशातली पहिली महानगरपालिका आहे. यामुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल आणि मुंबईला पर्यटन स्थळ म्हणून ओळखही मिळेल.”

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि बीएमसीचा प्रस्ताव

पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास निगम आणि बीएमसीने 128 वर्षे जुन्या असलेल्या बीएमसी भवनात हेरिटेज वॉक चालू करण्याचा संयुक्त प्रस्ताव मांडला होता. बीएमसीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबईत सर्वाधिक ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणांपैकी एक असलेली ही इमारत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे कायदे बनविणारे तत्कालीन व्हॉईसरॉय लॉर्ड रिपन यांनी त्यावेळी इमारतीची कोनशिला बसवली.

२५ एप्रिल १८८९ रोजी बांधकामाला प्रारंभ झाला आणि ३१ जुलै १८९३ रोजी पूर्णत्वास आले. फेड्रिक व्ल्यम स्टिव्हन्स या नामवंत वास्तुशिल्पकाराकडून मुख्यालय इमारतीचे संकल्पनाचित्र व आराखडे तयार करण्यात आले होते. याचे बांधकाम 50पेक्षाही कमी महिन्यांमध्ये पूर्ण झाले होते.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments