Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईनाकाबंदी : टपोरीने पोलीस उपनिरीक्षकाला उडवले

नाकाबंदी : टपोरीने पोलीस उपनिरीक्षकाला उडवले

Hit-and-run during lockdown; Cop run over by vehicle at Vasaiवसई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात 21 दिवसांसाठी लॉक डाऊन करण्यात आले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी सर्वत्र नाकाबंदी सुरू आहे. पण वसईत नाकाबंदी सुरू असताना एका टपोरीने मोटारसायकल चालकाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाकाबंदीदरम्यान त्याने चक्क पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर गाडी घातली. त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वसईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टपोरीला पोलिसांना ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील पाटील असे जखमी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी पोलीस उपनिरीक्षक वालीव पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. या विषयी अधिक माहिती अशी की, वसई पूर्व एव्हरशाईन सर्कल येथे घराबाहेर पडणा-या नागरिकांवर पोलिसांची कारवाई सुरु होती. त्या दरम्यान तो टपोरी दुचाकीवरून जात असताना त्याला पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने थेट दुचाकी उपनिरीक्ष पाटील यांच्या अंगावर टाकून दिली. ही घटना आज सकाळी 11 च्या सुमारास घडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments