Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईया वर्षी चाकरमान्यांसाठी सुट्यांची चंगळ

या वर्षी चाकरमान्यांसाठी सुट्यांची चंगळ

New Year Party,christmas party,new year 2020, new year party, new year evening,मुंबई : नवीन वर्ष २०२० ची आज बुधवारपासून सुरूवात झाली आहे. यामध्ये चाकरमान्यांसाठी सुट्यांची चंगळ असणार आहे. सन २०२० हे लीप वर्ष असल्याने फेब्रुवारीत २९ दिवस असून या वर्षात एकूण ३६६ दिवस मिळणार आहेत. या नूतन वर्षात एकूण २४ सुट्यांची चंगळ असणार आहे.

प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी), पारसी न्यू इयर (१६ ऑगस्ट), मोहरम (३० ऑगस्ट), विजयादशमी (२५ ऑक्टोबर) या चारच सुट्ट्या रविवारी येणार आहेत. इतर २० सुट्यांपैकी बकरी ईद (१ ऑगस्ट), स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट), श्रीगणेश चतुर्थी (२२ ऑगस्ट), दिवाळी लक्ष्मीपूजन (१४ नोव्हेंबर) या सुट्ट्या शनिवार-रविवारच्या सुट्टीला जोडून येणार आहेत. श्रीमहावीर जयंती (६ एप्रिल), रमजान ईद (२५ मे ), दिवाळी बलिप्रतिपदा (१६ नोव्हेंबर), गुरुनानक जयंती (३० नोव्हेंबर) या सुट्या रविवारला जोडून सोमवारी येणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments