Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईविरार : अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून

विरार : अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून

विरारमध्ये 62 वर्षीय पतीने 59 वर्षीय पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनैतिक संबंधांच्या संशयातून पती किशोर फुटाणे याने पत्नीची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

किशोर फुटाणे याने पत्नी सुलभा फुटाणे यांची गळा चिरुन हत्या केली. विरार पूर्वेकडील जीवदानी रोडवर असलेल्या भोईरपाडा भागातील बाळकृष्ण सोसायटीमध्ये हा प्रकार घडला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

फुटाणे दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी असून मुलीचं लग्न झालेलं आहे. आरोपी किशोर फुटाणे रिक्षाचालक आहे. सुलभा फुटाणे यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचा पतीला संशय होता. यावरुन दोघांमध्ये अनेक वेळा वादही व्हायचे.

आज रविवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास राहत्या घरातच फुटाणे पती-पत्नीचा वाद झाला. वादातून पतीने सुलभा यांचा गळा चिरलायामध्ये त्यांचा मृत्यू झाला. पत्नीची हत्या करुन तिला रक्ताच्या थारोळ्यात टाकूनरक्ताचे डाग अंगावर घेऊन आरोपी पती खुल्लेआम रस्त्यावरुन जात होता. जवळच असलेल्या गणपतीच्या मंडळातील सीसीटीव्हीमध्ये तो कैद झाला. पोलिसांनी पतीला ताब्यात घेऊन पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments