Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईपक्षाची सेवा करणं गुन्हा असेल तर तो मी केलाय, एकनाथ खडसे उद्विग्न

पक्षाची सेवा करणं गुन्हा असेल तर तो मी केलाय, एकनाथ खडसे उद्विग्न

eknath-khadse,Assembly Elections 2019
मुंबई: माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा पहिल्या यादीतून पत्ता कट करण्यात आला. नाराज खडसे म्हणाले की, “पण पक्षाला एक प्रश्न नक्की विचारणार की नाथाभाऊंचा गुन्हा काय ?  42 वर्ष पक्षाची सेवा करणं हा गुन्हा असेल, तर तो गुन्हा मी केलाय,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी माध्यमांशी बोलताना दिली.

भाजपच्या पहिल्या यादीत आयारामांना मानाचं पानं देण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर (दक्षिण-पश्चिम), चंद्रकांत पाटील (कोथरुड), अतुल भोसले (कराड-दक्षिण), शिवेंद्रराजे भोसले (जावळी) यांना उमेदवारी मिळाली आहे. पहिल्या यादीत विनोद तावडे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे, राज पुरोहित या दिग्गजांचं नाव नाही.

खडसेंनी पक्षाच्या एबी फॉर्मशिवायच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते अधिकृतपणे पक्षाचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल करतील. भाजपने अनेक दिग्गजांना वेटिंगवर ठेवल्यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. ग्रामीण भागात पक्षाचा विस्तार करणारे खडसे यांच नाव नसल्यामुळे खडसे समर्थकही नाराज झाले आहेत.
खडसेंना दुस-या यादीतही स्थान मिळालं नाही तर ते काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे. खडसे यांच्यावर भोसरी येथील जमिन घोटाळ्यावरून खडसेंना राजीनामा दिला होता. तेव्हापासून खडसेंकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments